जालना प्रकरणी परंडा कडकडीत बंद
जालना प्रकरणी परंडा कडकडीत बंद
परंडा दि.२ (प्रतिनिधी) - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषण सुरु असताना मराठा आंदोलकावर लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने कडकडीत बंद पाडून शासनाचा जाहीर निषेध नोंदविला. तर तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार उपस्थित होते .दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व लाठीचार्ज घटनेचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आरक्षणाची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्ष, संघटना व पदाधिकारी यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. तसेच परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता बससेवा ठप्प होती. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.
मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील महिला, मुले, तरूण तसेच वृध्द आंदोलकावर संबंधित पोलीस यंत्रणेने बेछूट व अमानुष लाठी चार्ज करून अनेक आंदोलकांना गंभीर जखमी केले व नाहक हवेत गोळीबार करून मराठा समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आंदोलकावर बेछुट लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित यंत्रणेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.