बोलका बाहुला हसमुखरावने केली मतदार जनजागृती

बोलका बाहुला हसमुखरावने केली मतदार जनजागृती 

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे.  स्‍वीप कार्यक्रमाची अधिकाधिक प्रचार प्रसिध्‍दी  करण्‍यासाठी निवडणूक विषयक बाबींची फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम व युट्युब आदी समाज माध्‍यमांवर लाईक / शेअरचे प्रमाण वाढविण्‍यासाठी  व्‍यापक प्रसिध्‍दी  देण्‍यासाठी उदयसिंह रामराव पाटील या राज्य  पुरस्कृत प्राप्त शिक्षकाचा बोलका बाहुला हसमुखराव सोबत मनोरंजनातून प्रबोधन दि.२७ सप्टेंबर रोजी येथील श्रीपराव भोसले ज्युनियर कॉलेज येथे बोलक्‍या बाहुल्‍याचा मतदार नोंदणी प्रबोधनपर कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या संपन्न झाला. या कार्यक्रमात उदयसिंह पाटील यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींनी तात्‍काळ मतदार नोंदणी करावी. तसेच आपल्‍या संपर्कातील सर्वांची मतदार नोंदणी होईल याबाबत मतदार साक्षर होवून मतदार नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस धाराशिवचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मतदार जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर तहसिलदार निलेश काकडे, नायब तहसिलदार जी.एस. स्वामी तसेच श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील व ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.वाय. घोडके यांनी केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !