धाराशिव नामांतराचा शिवसेना (बाळासाहेब) च्यावतीने जल्लोष

धाराशिव नामांतराचा शिवसेना (बाळासाहेब) च्यावतीने  जल्लोष

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने उस्मानाबादचे धाराशिव नामांतर केले आहे. या निर्णयाचे शिवसेना (बाळासाहेब) च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष दि.१६ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, उस्मानाबाद शहराला आधीचे धाराशिव हेच नाव द्यावे या मागणीसाठी आमच्या आधीच्या पिढीने मोठा संघर्ष केला. मोठी आंदोलने करून सरकारचे लक्ष या मागणीकडे कायम वेधले. त्या संघर्षाला आज खर्‍या अर्थाने यश आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे नामकरण होत असल्याचा आनंद आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत. यावेळी मागासवर्गीय जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, शहर संघटक रंजीत चौधरी, युवासेना शहरप्रमुख सागर कदम उपतालुकाप्रमुख प्रशांत पाटील, उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, नितीन चव्हाण, अमर माळी , प्रवीण पवार, काका खोत, भारत शिंदे , उद्धव अवचार,  दत्ता चव्हाण, ज्ञानेश्वर ठवरे, शुभम पांढरे, गणेश जाधव, राजेश माळाळे , सौरभ निंबाळकर आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !