नेटके यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून केली वृक्ष लागवड
नेटके यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून केली वृक्ष लागवड
परंडा दि.६ (प्रतिनिधी) - तालुक्यातील भोंजा हवेली जिल्हा परिषद शाळेत श्री गणेश बॅंक सेवा केंद्र व श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि. भोंजा हवेलीचे संचालक गणेश नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त केक न कापता अनोखा उपक्रम राबवुन झाडे लावा झाडे जगवा या संदेशातून विद्यार्थी यांना जागृत करून शालेय शिक्षकांनी सत्कार केला. यावेळी लघुउद्योग सल्लागार, संचालक गणेश नेटके यांनी शेती विषयक प्रश्नावली आयोजित केली असता शिक्षकांनी प्रश्नावली घेऊन पहिली ते ७ वी पर्यंत बरोबर उत्तर देणार्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून २५ किट साहित्य देण्यात आले व शालेय परिसर मध्ये रोपटे लावुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कवी मुख्याध्यापक श्री बाळासाहेब घोगरे, संचालक नवनाथ घाडगे, आदिकराव शेळवणे, सोमनाथ पवार, माळी, राऊत, धनंजय नेटके, विलास भांदुर्गे, बापुराव नेटके, बाळराजे काशीद, विशाल नेटके, रामा मदणे, संकेत नेटके आदी उपस्थित होते.