विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी केली साजरी

विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी केली साजरी

तुळजापूर दि.७ (प्रतिनिधी) - येथील न.प. प्रा. शाळा क्र. २, देवकी अंगणवाडी क्र. १५, (घाटशिळ) विभाग व ज्ञानदीप अंगणवाडी क्रमांक ४ (पापणास विभाग) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
  यावेळी अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. तर शाळेत दहीहंडी फोडून  विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
  दहीहंडीचे महत्व मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांनी सांगितले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन झाडपिडे सदस्य महेंद्र पाटील उपस्थित होते. अंगणवाडी सेविका किरण गरडकर, सोनाली शेटे, मदतनीस श्रीदेवी पाचंगे, छाया पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषा केल्या. सुज्ञानी गिराम, केरण    लोहारे, ऐश्वर्या जाधव, विद्यादेवी स्वामी यांनी नृत्य मार्गदर्शिका म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, महेंद्र पाटील, शिवा डाके यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !