पुसेसावळी हल्ला प्रकरणी सर्व आरोपींवर कठोर करण्याची मागणी
पुसेसावळी हल्ला प्रकरणी सर्व आरोपींवर कठोर करण्याची मागणी
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजावर काही गावगुंडानी हल्ला करून जबर मारहाण केली. तसेच मज्जिदसह घरांना आग लावण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दंगलीतील मुख्य आरोपी विक्रम पाऊसकर याच्यासह सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.१२ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात काही जातीवादी राजकीय पक्ष व त्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या जातीयवादी संघटनेचे नेते व कार्यकर्ते राजकीय कोळी बांधण्यासाठी समाजामध्ये देशाचे संभाषण करून समाजा समाजामध्ये जाती ते निर्माण करीत आहेत. त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला विशेष लक्ष करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. पुसेसावळी येथील काहीजणांनी कट करून बेकायदेशीर जमाव जमवून सोशल मीडियावर स्वतः चुकीचे मेसेज प्रसारित करून समाजामध्ये तेढ निर्माण केला. मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करून प्रार्थनास्थळातील व्यक्तींना जबर मारहाण केली त्यामध्ये पंधरा १० ते १५ लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यानंतर जमावाने मुस्लिम समाजाची घरे, दुकाने व हातगाडे यांची जाळपोळ करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. या सर्व प्रकारामागे मुख्य आरोपी असलेल्या विक्रम पाऊसकर यास अद्यापही अटक केले नसून ही अत्यंत चीड निर्माण करणारी बाब आहे. त्यामुळे त्याला ताबडतोब अटक करून सर्व षडयंत्राची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना गजाळ करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी व भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही. तसेच अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संपूर्ण संरक्षण देण्यात यावे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पसंख्यांक समाजाच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र कायदा करावा व दमली ज्यांचे नुकसान झाले आहेत. त्यांना शासनातर्फे भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. तर मयत झालेल्या मुरूम हसन लियाकत शिकलगार याच्या कुटुंबियास ५० लाख रुपयांची मदत द्यावी. तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संभाषणातून विष पेरण्याच्या हेतूने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस तात्काळ आवर घालण्यासाठी कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर मसूद शेख, खलील सय्यद, समयुद्दीन मशायक, आयाज शेख, एजाज काझी, खुददूस मोमीन, बाबा मुजावर, खादर खान, बिलाल तांबोळी, अतिक शेख, असद पठाण, इस्माईल काझी अनवर शेख, साबीर सय्यद, मुजीब काझी, ऑथर सय्यद, शकील सय्यद, इस्माईल शेख यांच्यासह आहेत.