छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण

छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणविस्तार अधिकारी दैवशाला हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.आठवी ते बारावी वर्गातील निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांमध्ये  यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले.
यावेळी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैवशाला हाके यांनी सर्वांगीण विकासामध्ये विविध स्पर्धा व गुणवत्ता विकास यांचे महत्व विशद केले. राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील यांनी मुक्तीसंग्रामातील मराठवाड्यातील जनतेने दिलेला अभूतपूर्व लढा आणि या लढ्यातील भाई नरसिंगराव देशमुख व भाई उद्धवराव पाटील यांचे अतुलनीय योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक विनय देशमुख यांनी‌ तर सूत्रसंचालन व आभार आण्णासाहेब कुरूलकर यांनी मानले. यावेळी आदर्श प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे, उपमुख्याध्यापक देटे एन.एम., पर्यवेक्षक व्ही.के. देशमुख आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !