५ ऑक्टोंबरला भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा

५ ऑक्टोंबरला भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा


धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची जुलै ते सप्टेंबर या कालावधीमधील त्रैमासिक सभा ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव महादेव किरवले यांनी दिली आहे.
माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती किंवा इतर स्त्रोताद्वारे शासकीय अधिकाऱ्यांविरुध्द तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे अथवा संबंधित विभागाने, तालुकास्तरीय समितीने कार्यवाही केली नसल्यास जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावी, असे आवाहन किरवले यांनी केले आहे. जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे अर्ज सादर करताना तक्रारदाराने तालुका, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे सादर केलेल्या तक्रारी अर्जाची छायांकित प्रत व पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
                          

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !