जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची केली आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची केली आरोग्य तपासणी

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे विनामूल्य आयोजन करण्यात आले. सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे शिबीर आयोजित करण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागांशी समन्वय साधून कृती आराखडा करण्यात आला. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली. त्यामध्ये फिजीशियन, सर्जन स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतरोग मुखरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ यांचा समावेश होता. दि.२१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान उमरगा, मुरुम, कळंब, तेर, वाशी, लोहारा व तुळजापूर तसेच चार दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग निहाय लाभार्थ्यांची तपासणी करुन सर्वांचे अर्ज भरुन विविध तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने कृती आराखडा तयार केलेल्या सत्रानुसार उमरगा, मुरुम, कळंब, तेर, वाशी, तुळजापूर व लोहारा आदी विविध ठिकाणी तपासणी केली.   उमरगा येथील शिबिराला डॉ.हेमलता रोकडे, डॉ.साईनाथ धुमाळ व डॉ.प्रभाकर बिचकटे या डॉक्टरांनी भेट दिली. शिबिरात ७१ अंगणवाडी सेविका,मिनीअंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये नव्याने निदान झालेले प्रत्येकी ४ रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, जुने पक्षघातासारखे आजार असल्याने आढळून आले.
तर मुरुम येथे डॉ.दिपक निभोरकर, डॉ.शंतनु पाटील व डॉ.प्रभाकर बिचकटे या तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी ११ महिलांना उच्च रक्तदाब व ७ महिलांमध्ये नव्याने मधुमेह असल्याचे निदर्शनास आले. तसेच ८ महिलांमध्ये संशयीत गर्भाशयाच्या पिशवीचे कर्करोग असल्याची लक्षणे दिसून आले. यावेळी १२८ महिलांची तपासणी करण्यात आली. तर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबीरास डॉ.मोहन राऊत, डॉ.प्रविण डुमणे व डॉ.सुधिर आवटे यांची आदी उपस्थित होते. यावेळी एकूण ९९ अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये नव्याने निदान झालेले ५ रुग्ण उच्च रक्तदाब, २ रुग्ण मधुमेह असलेले आढळून आले. तसेच तेर येथे डॉ.प्रमोद लोकरे, डॉ.सौरभ पाटील, डॉ.सीमा मोहिते या डॉक्टरांनी भेट दिली. यावेळी ९६ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मधुमेहाचे १० नवीन रुग्ण, उच्च रक्तदाबाचे ५ रुग्ण व कर्करोगाचे संशयित ३ रुग्ण आढळून आले. तर वाशी येथे डॉ.दिपक निभोरकर, डॉ.सुधिर आवटे, डॉ.कृष्णा उंदरे यांनी भेट दिली. यावेळी ५१ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मधुमेहाचे नवीन रुग्ण, उच्च रक्तदाबाचे ९ रुग्ण आढळून आले. तसेच तुळजापूर येथे डॉ.देशमुख, डॉ.गायकवाड, डॉ.सिमा मोहिते या डॉक्टरांनी भेट दिली. यावेळी २७६ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये संशयित कर्करोगाचा १ रुग्ण आढळून आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयामार्फत या शिबीरांतर्गत एकूण १ हजार २५४ अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण १५५ महिलांची  तपासणी करण्यात आली. ३५ महिलांना उच्च रक्तदाब, ३० महिलांना मधूमेहाचा आजार, १२ महिला संशयीत सीए कारविक्स, ८ महिलांमध्ये स्तनाचे कॅन्सरसारखे लक्षणे आदी गोष्टी तपासणी शिबीरांतर्गत निदर्शनास आल्या. जिल्ह्यातून विविध रुग्णालयांतून ८७ महिलांना विशेष उपचारासाठी धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या शिबिरासाठी जन औषध वैद्यकशास्त्र विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी बालविकास कार्यक्रम अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या समन्वयातून शिबीराचे यशस्वी आयोजन केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !