संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
- Get link
- X
- Other Apps
संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सर्व पिके करपून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी युवा स्वाभिमानी पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांसह संपूर्ण पिके वाळली असल्यामुळे १०० टक्के पीक विमा रक्कम देण्यात यावी. तर राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये व बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये सरसकट अनुदान तात्काळ देण्यात यावे. तसेच कामगार व मजुरांना दुष्काळी मदत म्हणून २५ हजार रूपये प्रती कुटुंबाला देण्यात यावी. त्याबरोबरच जिल्ह्यातील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुल्क व फिस माफ करून दुष्काळी मदत म्हणून प्रती विद्यार्थी २० हजार रूपये देण्यात यावी. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून दखल घेऊन तात्काळ संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मळगे, माजी सरपंच शिंदे व बबन राऊत यांनी केली आहे.
- Get link
- X
- Other Apps