आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सेमिनार पडले पार
धाराशिव(प्रतिनिधी) तालुक्यातील आळणी गडदेवधरी येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी .औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिमत्व विकास व इनसाईड इन नोवेल फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी या विषयावर एक दिवसीय सेमिनार पार पडले.. मनोज पारडे व इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसचे डिलिव्हरी मॅनेजर डॉ.बाळासाहेब वाघ यांनी मार्गदर्शन केले. तर मनोज पारडे यांनी बी.फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करत असताना करिअरच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्तिमत्व विकास किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे ? तसेच विद्यार्थ्यांचा बाह्यंग विकास न होता. तो अंतरंगाने कसा होईल ? तसेच व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कम्युनिकेशन स्किल हे किती महत्त्वाचे असते ? हे उदाहरणांसह पटवून सांगितले. तर डॉ.बाळासाहेब वाघ म्हणाले की, फार्मसी क्षेत्र काल, आज आणि उद्या, फार्मसी क्षेत्राचा वाढत चाललेले महत्त्व, फार्मसी क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या संधी आणि जगाचा भारताकडे फार्मसीच्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निशी नंदन शिंदे, असलम तांबोळी, राम लोमटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.