गणेशोत्सव स्पर्धेत १५ सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदविता येणार - मोरे

गणेशोत्सव स्पर्धेत १५ सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदविता येणार - मोरे
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आवाहनानुसार राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुंबई येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाईन अर्ज करावेत. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !