सोलापूर-धुळे महामार्ग लगत सर्विस रस्त्यासाठी ८० कोटी मंजूर - खा राजेनिंबाळकर

सोलापूर-धुळे महामार्ग लगत सर्विस रस्त्यासाठी ८० कोटी मंजूर - खा राजेनिंबाळकर

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गा क्र. २११ लगत सर्विस रोड व उड्डाण पुलावरील विद्युती करणासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वारंवार पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा केला होता. या महामार्गलगत सर्विस रोड नसल्यामुळे वाहतूक करताना वाहनधारक व नागरिकांस अनेक अडचणींचा सामना करत लागत होता. तसेच उड्डान पुलावरती प्रकाश योजना नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत होते. त्यासाठी दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी धाराशिव शहरातील शिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्या सोबत आढावा बैठक घेतली त्यानंतर दि.१३ जून २०२२  दिशा समितीच्या बैठकीमध्ये शहरातील उर्वरित ७.१४ कि.मी. लांबीचा सर्विस रोड व सध्या अस्तित्वात असलेल्या १.८ कि.मी सर्विस रोडचे रुंदीकरण व विद्युतीकरण करणे तर येडशी येथील टोल वसूली बंद करण्यासाठी प्रकल्प संचालक सोलापूर यांना सूचना दिल्या नंतरीही या अपूर्ण कामांमध्ये प्रगती दिसून येत नव्हती. त्यामुळे
प्रकल्प संचालक, सोलापूर यांना या अपूर्ण कामांबाबतचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण, मुंबई येथे पाठविण्यास सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली येथे भेटून या महामार्गच्या अपूर्ण कामाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने धाराशिव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा २११ साठी ८० कोटी (जीएसटी वजा करुन ६८.४१ कोटी) एवढा निधी मंजूर केल्याअसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. या अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याने धाराशिव शहरवासियांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !