झाडांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे
झाडांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे
तुळजापूर दि.३१ (प्रतिनिधी) - येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ व देविका अंगणवाडी क्र.१५ मधील विद्यार्थी व शिक्षकांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना तर शिक्षकांनी शाळा परिसरातील सर्व झाडांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपनाची व सर्व जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली.
यावेळी सहशिक्षका सुज्ञानी गिराम यांनी रक्षाबंधनचे व वृक्षारोपणाचे व त्याच्या संवर्धनाचे महत्व सांगितले. प्रास्ताविक केरण लोहारे यांनी तर सूत्रसंचालन ऐश्वर्या जाधव यांनी व आभार विद्यादेवी स्वामी यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, अंगणवाडी मदतनीस किरण गरडकर, श्रीदेवी पाचंगे आदी उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ओवाळणी म्हणून शैक्षणिक साहित्य दिले.