आरक्षणासाठी कामेगाव पाटीवर रस्ता रोको आंदोलन
आरक्षणासाठी कामेगाव पाटीवर रस्ता रोको आंदोलन
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) -
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिव-औसा राज्य मार्गावरील कामेगाव पाटी येथे दि.१३ सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे यांनी अमर उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या ३० दिवसापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात कामेगाव, सांगवी, बोरगाव, समुद्रवाणी, राजुरी येथील नागरिकांनी सहभाग नोंदवला. तब्बल १ तास हे आंदोलन चालल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.