धोकादायक ! १३५६ घरांच्या पाणी साठ्यामध्ये डास अळ्या आढळल्या
धोकादायक ! १३५६ घरांच्या पाणी साठ्यामध्ये डास अळ्या आढळल्या
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - जिल्ह्यामध्ये ताप, डेंग्यु व चिकुनगुनीया या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी एक दिवसीय जलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण धडक मोहीम दि.२७ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये तपासण्यात आलेल्या ३४ हजार ३२२ घरांचा सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १३५६ घरांच्या पाणी साठ्यामध्ये डास अळ्या आढळून आल्या. या मोहीमेमध्ये वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहीले.
मोहीमेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील ५५ आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका इतर कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात आली.
मोहीमेमध्ये डास अळी वाढ व ताप रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन जसे की कोरडा दिवस पाळणे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे व अबेट कार्यवाही करणेतसेच घरांचे परिसरातील टायर्स / टयुब फुटकी भांडी आदी रिकामे करण्याबाबत जनाजागृती करण्यात येत आहे. तसेच आरोग्य यंत्रणे मार्फत ताप, डेंग्यू व चिकुनगुनीया रुग्ण आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेशी संर्पक करून उपचार घेण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरीदास, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. इस्माईल मुल्ला व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ दिपक मेंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरित्या राबविण्यात आली.