श्री सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या गळीत हंगामाचा कुलकर्णी पती-पत्नीच्या हस्ते अग्निप्रतिपन

श्री सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या गळीत हंगामाचा कुलकर्णी पती-पत्नीच्या हस्ते अग्निप्रतिपन

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. या कारखान्याचा सन २०२३-२४ चा चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी दिपाली कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

या वर्षीच्या चाचणी गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून करुन परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणार आहे. यावेळी सरपंच अमोल पाटील, वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, ग्रा.पं.सदस्य नितीन बंडगर, नितीन भोसले, व्यंकटेश कोरे, प्रतिक देवळे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, बलराम कुलकर्णी, प्रकाश जोशी यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !