लाडक्या गणरायाचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत

लाडक्या गणरायाचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत


गणपती बाप्पा मोरया घोषणांनी चौक दुमदूमले


धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पांचे गणेश भक्तांनी लेझीमच्या तालात, फटाके फोडीत व हलगीच्या तालावर ठेका धारीत जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंदिरात परंपरेनुसार गणरायाचे आगमन झाले असून धार्मिक विधींसह गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी तुळजा भवानी मंदिर सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, पुजारी उपस्थित होते.


जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच चौकाचौकामध्ये गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. महिला व पुरुषांसह बालकांनी देखील गणेश मूर्ती खरेदी केल्या. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गणेश मंडळांनी कालपासूनच मंडप उभा केले असून रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. तर विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य देखील खरेदीसाठी उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेत नागरीकांची झुंबड उडाली आहे. दिवसभर हलगी चा नाद गुलालाची उधळण व गणपती बाप्पा मोरया या घोषाने परिसर दुमदुमून गेले होते. गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गीतांच्या तालावर ठेका धरीत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढीत गणेशाचे स्वागत केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !