रस्त्यावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
रस्त्यावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
उमरगा दि.३१ (प्रतिनिधी) - पोलिस सस्टेशन पथकाची दमदार कामगिरी रोडवर लुटमार करून हंटरने मारहाण करणारी परराज्यातील टोळीचा फर्दाफाश करून परराज्यांतील एकास बेड्या ठोकल्या आहेत.
उमरगा पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसापूर्वी तुरोरी ते दगड धानोरा जाणारे रोडवर सलग दोन दिवस रात्री च्या वेळेला गाडी अडवून हंटर न जबर दुखापत करून लुटण्याचा प्रकार घडला होता या संदर्भाने पोलिस स्टेशन उमरगा येथे गुरन ४५७/२३, व ४६५/२३ कलम ३९४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी ३ वेगवेळे पथकाची नेमणूक करून गुन्हा उघडकीस आण्यासाठी उमरगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावरुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता सदर आरोपी हे परराज्यातील असल्याचे समजले. त्यावरुन एक पथक तात्काळ रवाना होऊन कर्नाटक येथील लाडवंती ता बसवकल्यान जिल्हा बिदर येथे जाऊन एकास ताब्यात घेतले. प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यास खाक्या दाखवत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यात सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला मोबाईल ताब्यात घेवून अटक करण्यात आली व यातील इतर आरोपीतांचे शोध कार्य सुरू आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक परेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार, पोहेका सुर्यवंशी पोना यासिन सय्यद, अनिरुद्ध कावळे, पोका नवनाथ भोरे, सिध्देश्वर उंबरे, सायबर विभागाचे पोका अशोक कदम, सुनील मोरे यांनी केली आहे