कुलकर्णी यांच्या हस्ते मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
कुलकर्णी यांच्या हस्ते मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - येथील लातूर पॅटर्न अकॅडमीमध्ये शिक्षण घेतलेल्या व एमबीबीएस तसेच बीएएमएस प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दि.२३ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
धाराशिव शहरातील लातूर पॅटर्न अकॅडमी मध्ये शिक्षण घेतलेल्या व नीट परीक्षेची उत्तीर्ण होऊन मेडिकल साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी गट शिक्षण विस्तार अधिकारी दैवशाला हाके, मोदाण, नितीन शेरखाने, मोदाणी, लातूर पॅटर्नचे बलवीर आदी उपस्थित होते. यावेळी एमबीबीएस प्रवेश घेतलेल्या इंजिला शेख, आशिष घोडके, सादिया शेख, ऋतुजा स्वामी, ऋषिकेश घोडके यांचा तर बीएएमएससाठी प्रवेश घेतलेल्या वैभवी कांबळे आदित्य जाधव जानवी पाटील सानिया पठाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.