आयुष्मान भव: मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा - ओंबासे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी

आयुष्मान भव: मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा - ओंबासे

नागरिकांची होणार आरोग्य तपासणी

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - सर्व वयोगटांतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आयुष्यमान भव: ही मोहीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
आयुष्यमान भव: मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विषयक तपासण्या केल्या जाणार आहे.आयुष्यमान आपल्या दारी ३.० या उपक्रमामध्ये जिल्ह्यांतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे.
       आयुष्यमान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांच्या जनजागृतीसाठी ग्रामपंचायतच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग, आयुष्यमान कार्ड व आभा कार्डसोबत जागृती करण्यात येणार आहे.
        आयुष्यमान मेळावा अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कर्करोग, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा इत्यादींबाबत जनजागृती, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड तयार करणे यासह आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान भव: मोहिमेचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दर आठवड्याला तपासणी
         आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर दर आठवड्यास तपासणी केली जाणार आहे. ४ आठवड्यांपर्यंत ही तपासणी होणार आहे. आयुष, मानसिक आरोग्य वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, नाक व घसा आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी व टेलिकन्सल्टेशन सेवा देण्यात येणार आहे.
मुलांच्या ३२ सामान्य आजारांची तपासणी
        आयुष्यमान भव: मोहिमे दरम्यान सर्व अंगणवाडीतील मुले व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुलांच्या ३२ सामान्य आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता असल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्यदेखील देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांनी या मोहिमे दरम्यान आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी झाली की नाही ? याची खात्री करणे अपेक्षित आहे. 
         जिल्ह्यात आयुष्यमान भव: मोहिमेचा शुभारंभ झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील मुलांची तपासणी व उपचार केले जातील. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आयुष्मान भव या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन ओंबासें व गुप्ता यांनी केले आहे.
                                           

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !