डॉ. आमटे यांच्या हस्ते डॉ.स्मिता लोंढे यांना पदवी प्रदान

डॉ. आमटे यांच्या हस्ते डॉ.स्मिता लोंढे यांना पदवी प्रदान

तुळजापूर दि.२१ (प्रतिनिधी) -  येथील डॉ.स्मिता लोंढे यांना विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात जेष्ठ समाजसेवक, पद्मश्री, रेमन मैग्सेसे पुरस्कार प्राप्त डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते एम.डी.भूलतज्ञ ही पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ.स्मिता लोंढे यांनी नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयातुम एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले होते. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथे ३ वर्ष सेवा दिली होती. त्यानंतर मुंबई येथे लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयाततून वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी. भूलतज्ञ पदवीधर पदवी पूर्ण केली.

डॉ.स्मिता लोंढे या सद्या तुळजापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. एम.डी.भुलतज्ञ पदवी प्राप्त केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रीधर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.हणमंत होणमाने, बालरोगतज्ञ डॉ.प्रणिता गडेकर, प्रशांत केवडकर, डॉ.अजय घाडगे, डॉ.प्रतिभा घाडगे, डॉ.प्रसन्न घाडगे, दिपकराज लोंढे, विद्या लोंढे, सूरज लोंढे, धीरज लोंढे आदींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !