टेकटेक्स्टिल प्रदर्शनामध्ये एमआयडीसी कौडगाव एमआयडीसीचा स्टॉल लावणार - आ पाटील

टेकटेक्स्टिल प्रदर्शनामध्ये एमआयडीसी कौडगाव एमआयडीसीचा स्टॉल लावणार - आ पाटील

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - तांत्रिक वस्त्र निर्मिती उद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य प्रदर्शन दि.१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान मुंबई येथे आयोजित असून पहिल्यांदाच एमआयडीसी यामध्ये सहभागी होत कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल्स पार्कचे दालन लावणार असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंट मध्ये टेकटेक्स्टिल नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये जर्मनी, चीन व तैवानसह जगभरातील १६० हून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. या प्रदर्शनामध्ये तांत्रिक कापड निर्मितीसाठी आवश्यक मशीनरी, इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज निर्माते, विक्रेते व पुरवठादार सहभागी होणार आहेत. देश विदेशातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षमता याठिकाणी निदर्शनास येणार आहेत. भारतातील तांत्रिक वस्त्र निर्मिती उद्योग हा जगातील ५ वा सर्वात मोठा उद्योग असून जवळपास २ हजार कोटींची वार्षिक उलाढाल असणारा हा उद्योग आगामी ५ वर्षात ४ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उदिष्ट आहे. तांत्रिक वस्त्र उत्पादनांची विविध उपयोजन क्षेत्रात असलेली मोठी मागणी आणि सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील गतिशीलता यातून या उदयोन्मुख उद्योगाची भविष्यातील मोठी कामगिरी सूचित होते. या उद्योगात रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. तसेच धाराशिवला एमआयडीसीच्या माध्यमातून देशातील पहिला तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये एमआयडीसीला आवर्जून सहभागी होण्याचे सुचित केले होते. आ. पाटील हे या विषयात वैयक्तिक लक्ष घालत असून प्रदर्शनीला भेट देत उद्योजक व व्यावसायिकांशी चर्चा  करणार आहेत. या माध्यमातून तांत्रिक वस्त्र

निर्मिती उद्योग कौडगाव एमआयडीसीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आ पाटील यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !