धाराशिव नामकरणाचा शिवसेना (ठाकरे) च्यावतीेने जल्लोष

धाराशिव नामकरणाचा शिवसेना (ठाकरे) च्यावतीेने जल्लोष

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - राज्य सरकारने उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेऊन अधिकृत राजपत्र जारी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा शिवसेना (ठाकरे) च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून व आपला जीव...धाराशिव....अशा घोषणा देत दि.१६ सप्टेंबर रोजी जल्लोष केला.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याची अनेक वर्षापासून प्रयत्न होते. त्यासाठी शिवसैनिकांनी काठ्या झेलून अनेकदा आंदोलने केली. तसेच पोलीस केसेस अंगावर घेतल्या. त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना विश्वासात घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या दोन्ही शहरांचे नामकरण झाले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज स्वप्नपूर्ती झाल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवि वाघमारे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, सुरेश गवळी, नितीन शेरखाने, सुनील वाघ, अभिराज कदम, अजित बाकले, शिवप्रताप कोळी, संकेत सुर्यवंशी, अजिंक्य राजेनिंबाळकर, पिंटू आंबेकर, गणेश साळुंके, संदीप शिंदे, प्रभाकर राजेनिंबाळकर, सुमित बागल, सागर कोळपे, जगदीश शिंदे, गुड्डू शेख, सह्याद्री राजेनिंबाळकर, बबलू राऊत, पांडुरंग माने, धनंजय इंगळे, दीपक पाटील, वैभव वीर, संजय भोरे, दिलीप सूर्यवंशी, पृथ्वीराज देडे, प्रशांत जगताप, रुपेश शेटे, नंदू माने, बाळासाहेब मुंडे, ओंकार बांगर, दिनेश बंडगर, नाना घाटगे, दीपक नागरसोगे, अजय जाधव, यशवंत शहापालक, चेतन वाटवडे, अमोल डुरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !