माने कुटुंबियांचे आ माने व चालुक्य यांनी केले सांत्वन

माने कुटुंबियांचे आ माने व चालुक्य यांनी केले सांत्वन 
उमरगा दि.१३ (प्रतिनिधी) - 
मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या किसन चंद्रकांत माने यांच्या कुटुंबियांची आ अभिमन्यू पवार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. वेळोवेळी आम्ही मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला असून यापुढेही करणार आहोत. त्यामुळे मराठा बांधवानी संयम बाळगावा असे आवाहन आ. पवार व चालुक्य यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. या आंदोलन ‌दरम्यान उमरगा तालुक्यातील किसन माने या तरूणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीचे आ पवार आणि चालुक्य यांनी माने कुटुंबियांची भेट घेतली. माने कुटुंबियांचे सांत्वन करत सध्याचे सरकार हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करत असून मराठा समाजाने संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !