आदर्श शिक्षक तनमोर नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - रोटरी क्लबच्यावतीने दिला जाणारा नेशन बिल्डर पुरस्कार सांजा इंटरनॅशनल स्कूल येथील प्राथमिक श्यामसुंदर महादेव तनमोर यांना सपत्नीक रोटरी क्लबच्या सभागृहात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनार साळुंखे तर प्रमुख पाहुणे डॉ. मीना जिंतूरकर या होत्या. तनमोर यांना सांजा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणांकनावर आधारित उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. त्यांनी शाळेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उपचारात्मक वर्ग, शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर, इंग्रजी वर्तमानपत्र वाचन सराव, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत असे उपक्रम राबवितात.