आकांक्षीत परंडा तालुका कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

आकांक्षीत परंडा तालुका कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

धाराशिव दि.३०  (प्रतिनिधी) - आकांक्षित तालुका कार्यक्रम हा सध्या देशभरात भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात येत आहे. देशात एकूण ५०० पंचायत समित्यांमध्ये राबविण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याची  तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. ३ ते ९ ऑक्टोबर  दरम्यान या कार्यक्रम अंतर्गत संकल्प सप्ताह राबविला जाणार आहे. या संकल्प सप्ताहचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे दि.३० सप्टेंबर रोजी करण्यात आले. 
यावेळी कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनयशिल कुलकर्णी, सिरसावचे सरपंच कुमार वायकुळे,  गट व्यवस्थापक तुकाराम ढोरे आदी उपस्थित होते. परंडा तालुक्याची आकांक्षित तालुका म्हणून निवड झाली आहे. यावेळी ऑनलाईन जवळा, सिरसाव, वाकडी,‌ अनाळा, शेळगाव, चिंचपूर बुद्रुक, लोणी, आसू, शिराळा व सोनारी या १० मोठया ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य, बचत गट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !