गट शिक्षण कार्यालयाच्या युजर आयडी, पासवर्डमधून जीपीएफ स्लिप ऑनलाईन उपलब्ध करावी

गट शिक्षण कार्यालयाच्या युजर आयडी, पासवर्डमधून जीपीएफ स्लिप ऑनलाईन उपलब्ध करावी


धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - गट शिक्षण कार्यालयाप्रमाणे कर्मचार्‍यांचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून घेण्यासाठी गट शिक्षण कार्यालय व कर्मचारी यांच्या लॉगीनवर ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यामुळे कर्मचार्‍यांना जिल्हास्तरावरील वित्त विभागाकडे न जाता त्यांना गट शिक्षण कार्यालयस्तरावरच जीपीएफ स्लिप उपलब्ध होतील, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोअर कमिटीचे नेते  कल्याण बेताळे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आपल्या मुख्य लेखा व वित्त विभागाने महाराष्ट्र राज्यात तिसर्‍या क्रमाकांला सीएमपी लागू करून नंतर झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे बजेट प्राप्त होताच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या खाती वेतन जमा करण्याचा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे यशस्वी केला. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपला गौरवही केला आहे. तसेच सध्या जीपीएफची स्लिप ऑनलाईन देण्याबाबत आपल्या कार्यालयाकडे पूर्वीपासून सर्व यंत्रणा तयार असल्याचे तत्कालीन लेखा व वित्त अधिकारी यांनी समितीच्या शिष्टमंडळाला अवगत केले होते. यावर्षीच्या स्लिप वाटपानंतर यापुढे जीपीएफच्या स्लिप या गटशिक्षण कार्यालयाकडे युजर आयडी व पासवर्ड वापरून देण्यात येतील, असे सांगितले होते. त्यासाठी कर्मचार्‍याचा युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन गटशिक्षण कार्यालयाप्रमाणेच ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून घेण्यासाठी गटशिक्षण कार्यालय तसेच कर्मचारी यांच्या लॉगीनवर ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून कर्मचार्‍यांना जिल्हास्तरावरील वित्त विभागाकडे न जाता त्यांना गटशिक्षण कार्यालयस्तरावरच जीपीएफ स्लिप उपलब्ध होतील. सदरील प्रणाली उपलब्ध असल्यामुळे पूर्वचर्चेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे कार्यान्वयन करण्यात यावे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी कालमर्यादेत निर्णय होऊन एक गुड गव्हर्नस् लागू करून वित्त विभागाच्या गौरवात भर टाकावी. तसेच यापूर्वी सीएमपी वेतन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करून ५ तारखेपर्यंत शिक्षकांना वेतनाचा लाभ दिल्याबद्दल मुख्य लेखा व वित्त विभागाचे आभारही समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहेत.
...............

जीपीएफची रक्कम काढण्याचे अधिकार बीडीओना देण्याबाबत निर्णय लवकर घेण्यात यावा.  कारण त्यांचे स्तरावरील शिक्षकाचे  वेतनाचे प्रमाण कमी झाले आहे
- बाळासाहेब घेवारे

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !