पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील व माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अमर बाकले, सागर दंडनाईक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.