गौरी गणपती स्पर्धेतील विजेत्या देखाव्यास बक्षिसाचे वितरण

गौरी गणपती स्पर्धेतील विजेत्या देखाव्यास बक्षिसाचे वितरण


धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - येथील लेडीज क्लबच्यावतीने गौरी गणपती देखावा स्पर्धेतील विजेत्यांना लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन दि.२४ सप्टेंबर रोजी गौरविण्यात आले. दरम्यान गणपती अथर्वशीर्ष पठणास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लेडीज क्लबच्यावतीने  संपूर्ण जिल्हाभरासाठी गौरी गणपती देखावा सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते.   अत्यंत कल्पकतेने अनेक महिलांनी आपल्या गौरी गणपतीची सजावट केली होती. यामधून अनेकींनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जिल्हाभरातून एकूण ७० स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. उत्कृष्ट देखावा सादर केलेल्यामध्ये तुळजापूरच्या कविता कदम यांनी महाकालेश्वराचा अप्रतिम देखावा व पौर्णिमा भोसले यांनी देवीची ९ रूपे अत्यंत सुंदररित्या सादर केली होती. त्यामुळे प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक आशा पाटील, निशिगंधा पाटील, अर्चना चोपदार व पल्लवी रोचकरी यांना तसेच तृतीय पारितोषिक श्रुतिका हजगुडे, सविता सुतार, सुवर्णा तांबारे, सोनाली पडवळ, निकिता कासार व शिल्पा पांचाळ यांच्या देखाव्याला मिळाले. तर विशेष प्राविण्य असलेल्या ज्योती कावरे, नयना पाळणे, अर्चना निंबाळकर, शीला अडसूळ यांच्याही देखाव्याला सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, महिलांमध्ये अनेक कौशल्य असतात. या गौरी गणपतीमुळे त्यांना देखावा सादरीकरणाची उत्तम संधी असून कोणी आपल्या कामाची दखल घेतली की प्रेरणा मिळते. त्यामुळे मी दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करत आहे. याला मैत्रिणींनी उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण करणे परीक्षाकासाठी अत्यंत कठीण काम होते. कारण प्रत्येकींनीच देखावा अप्रतिम सादर केला होता. यामध्ये अनेकींनी  सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. इतर मैत्रिणींनी देखील त्यांच्या देखाव्यातून प्रेरणा घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !