के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या हस्ते आज अनावरण

के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या हस्ते आज अनावरण

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दि.११ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संस्थापक सचिव कै के.टी. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ सुभाष देशमुख, आ सुरेश धस, आ रमेश कराड, आ. संजय केणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भोसले हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, अभियंता व विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या २२ हजार माजी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी भोसले हायस्कूलच्या मैदानावर २२ हजार नागरिक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप उभा केला आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण महर्षी गुरुवर्य के.टी. पाटील सर (बप्पा) स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष तथा आमदार श्रीकांत भारतीय, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, जय तुळजाभवानी सहकार बँकेचे चेअरमन संजय पाटील, गुरुवर्य के.टी. पाटील स्मारक समितीचे फुलचंद गाडे, संचालक विठ्ठलराव पडवळ, विजयसिंह थोरात, उदयसिंह राजे, संतोष कुलकर्णी, प्रेमा पाटील, बाजीराव जाधव, आदित्य पाटील, केशव जाधव व महेश शिंदे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !