प्रा. सुर्यवंशी यांना स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
- Get link
- X
- Other Apps
कळंब दि.९ (प्रतिनिधी) - शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा.डॉ. दीपक सुभाषराव सुर्यवंशी (मराठी विभाग) यांना हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरील स्व.मारोतराव कऱ्हाळे आदर्श पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे.
निवडीचे पत्र संयोजक प्रा.डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिले आहे. या पुरस्काराचे वितरण हिंगोली येथे ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे.
प्रा.डॉ. सुर्यवंशी हे महाविद्यालयात २००६ पासून मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांचे क्रांतिरत्न महाग्रंथ, ललितगंध, समतावादी साहित्यीक अण्णाभाऊ साठे आणि रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाड:मय आदी पुस्तके प्रकाशित आहेत. याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, डॉ.हेमंत भगवान, डॉ . के.डी. जाधव, प्रा.दादाराव गुंडरे, हनुमंत जाधव, अरविंद शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.
- Get link
- X
- Other Apps