व्यंकटराव गुंड यांनी हरितक्रांती घडविली - ठाकूर

व्यंकटराव गुंड यांनी हरितक्रांती घडविली -  ठाकूर

धारशिव दि.२९ (प्रतिनिधी) - रुपमाता उद्योग समूहाने जिल्ह्यात दूध डेअरी, गूळ पावडर उद्योग, पतसंस्था आदींच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे हरितक्रांती घडविली असल्याचे मत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी व्यक्त केले.

धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपमाता नॅचरल शुगरच्या ५ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलिंद पाटील, रामदास कोळगे, कैलास शिंदे, सतीश देशमुख, डॉ. गोविंद कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, दत्ता सोनटक्के, रमेश रणदिवे, भाऊसाहेब गुंड, अजित गुंड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपामाता उद्योग समूहाचे संस्थपक अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी तर आभार कार्यकारी संचालक अजित गुंड यांनी मानले. कार्यक्रमाला रुपामाता उद्योग समुहातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !