जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा पडली पार
जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा पडली पार
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड अनिल काळे, लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर विजेत्यांना मेडल आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर व क्रीडा अधिकारी नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धा पंच म्हणून शुभम जकाते व राजाभाऊ कारंडे यांनी काम पाहिले. मुलींमध्ये प्रियंका हंगरगेकर, संस्कृती जळकोटे, शुभांगी नलावडे तर मुलांमध्ये प्रथमेश अमृतराव, कृष्णा थिटे व स्वराज भिसे हे खेळाडूंनी आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला.