तेरणाच्या विद्यार्थ्यांनी टेक इव्हेंटमध्ये सादर केले नाविन्यपूर्ण प्रकल्प

तेरणाच्या विद्यार्थ्यांनी टेक इव्हेंटमध्ये सादर केले नाविन्यपूर्ण प्रकल्प 



 

 धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच अभियांत्रिकी दिनानिमित्त विविध टेक्निकल कार्यक्रमांनी सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या अखेरीस बेसिक सायन्स विभागाच्यावतीने टेक्निकल इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३, जीएसएलव्ही, स्मार्ट होम सारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  विक्रमसिंह माने यांनी भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. तर राधा निंबाळकर हिने स्वागत गीत सादर केले.  यावेळी  बेसिक सायन्सच्या विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे, मोहम्मद रिजवान कपूर, विभाग प्रमुख व अकॅडमीक डीन डॉ.डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे, प्रा.सुजाता गायकवाड, प्रा शीतल पवार, प्रा योगिता अजमेरा, प्रा सुनीता गुंजाळ तसेच विशेष प्रमुख पाहुणे म्हणून बसवकल्याण येथील तंत्रनिकेतनचे प्राचार्य आणि महाविद्यालयाचे माजी प्रा. एन आर कोडले आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. माने यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी डॉ. माने म्हणाले की, अभियांत्रिकीमध्ये प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्त्व असून पदवी संपताना शेवटच्या वर्षात विद्यार्थी करतात. परंतू सध्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम प्रकल्प सादर करून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय १९८३ सालापासून कौशल्यपूर्ण अभियंते घडवत असून त्याची सुरुवात प्रथम वर्षापासूनच केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध अंगभूत कौशल्य या प्रकल्पामधून आपल्याला पाहायला मिळाले. विविध कलागुणांना यामुळे विद्यार्थ्यांना वाव मिळत असून त्यांच्या भविष्यासाठी महाविद्यालयाकडून टेक्निकल इव्हेंटचे यशस्वी आयोजन प्रत्येक वर्षीच बेसिक सायन्स विभागाच्यावतीने केली जाते. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मासकी नावाचा रोबोट, इलेक्ट्रिक स्कूटर बनवली असून ज्याची दखल देशपातळीवरील बातमीपत्रांनी घेतली. त्यांनी प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प, पोस्टर सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.  या विद्यार्थ्यांची नक्कीच लवकर प्लेसमेंट होऊन त्यांना भरघोस असे पॅकेज मिळेल हा विश्वास नाही तर खात्री असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच तेरणामध्ये उत्कृष्ट अभियंते आणि फार्मासिस्ट बनत असल्याने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेसिक सायन्स विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश त्यांना नक्कीच मिळते. तसेच फक्त शिक्षित व डिग्री होल्डर इंजिनिअर होण्यापेक्षा त्यांनी स्वतःमधील कौशल्य विकसित केले पाहिजेत. आणि उत्तम अभियंता बनला पाहिजे. यासाठी त्यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांनी अंगभूत असलेली कौशल्य वापरून देशाच्या आर्थिक विकासात कशा प्रकारे मदत केली ? याची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी फेसा (फर्स्ट इयर इंजीनियरिंग स्टुडन्ट असोसिएशनचे) उद्घाटन करण्यात आले. तर मागील ३ महिन्यांपासून महाविद्यालयात चालू असणाऱ्या इनोव्हेथॉनच्या यशस्वी स्पर्धकांना बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. टेक्निकल इव्हेंटमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक प्रकल्पाचे सादरीकरण केले. ज्यामध्ये नुकत्याच भारताने सादर केलेल्या चांद्रयान- 3 , जीएसएलव्ही प्रतिकृती, तसेच स्मार्ट होमच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केल्या . त्याला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. तसेच पीपीटी सादरीकरणात विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,सायबर सेक्युरिटी ,चांद्रयान, स्मार्टफोन या विषयाचा समावेश केला होता. पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये सिव्हिल , मेकॅनिकल ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन , कॉम्प्युटर , आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स  या सर्व विषयांचा समावेश होता .

*यावेळी प्राचार्य  डॉ. माने यांनी  विशेष उल्लेख केला की या विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना शोधून महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज या कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नावीन्यतम विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना आपली नोंद करून नाविन्यपूर्ण संकल्पनाचे स्टार्टअप मध्ये रूपांतर करण्याची संधी मिळणार आहे .त्यांच्या या आयडिया  जागतिक स्तरावरील  हॅकॅथॉन- 2003 यामध्ये सुद्धा मांडण्याची त्यांना  संधी मिळणार आहे* याप्रसंगी फेसामध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .टेक्निकल इव्हेंट मध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्षाच्या विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा बालाजी चव्हाण ,प्रा.मनोज जोशी ,प्रा. दयानंद मुंडे  ,सतीश नेपते व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा चांदणे व श्रेया गिरवलकर यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जय हंचाटे, पृथ्वीराज ढवळे, समर्थ यादव, आदित्य पवार, अमर शेख, पल्लवी दसपुते, सिद्धी मोरे, प्रियंका चौधरी, अर्पिता मुळे, अस्मिता मुळे, पायल जाधव, राजनंदिनी मोकाशी, विश्वजीत मानगुडे, श्रेयस लोमटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !