आ काळे यांच्या हस्ते शिक्षिका सय्यद महाराष्ट्र राज्य उर्दू पुरस्काराने सन्मानित
आ काळे यांच्या हस्ते शिक्षिका सय्यद महाराष्ट्र राज्य उर्दू पुरस्काराने सन्मानित
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका तसनीम सुलताना मोईनोद्दीन सय्यद यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२-२३ आ विक्रम काळे यांच्या हस्ते लातूर येथे दि.२४ सप्टेंबर रोजी देऊन गौरविण्यात आले.
तसनीम सुलताना सय्यद यांच्या उत्कृष्ट अध्यापन, शाळेतील सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग, इयत्ता १० वी उर्दूचा १०० टक्के निकाल या सर्व गुण कौशल्यांचा विचार करून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल असे आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.