येणाऱ्या पिढीत माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी शिक्षक व पालकांनी संवाद वाढवावा - शिंदे
- Get link
- X
- Other Apps
येणाऱ्या पिढीत माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी शिक्षक व पालकांनी संवाद वाढवावा - शिंदे
उमरगा दि.१० (प्रतिनिधी) - सध्या नवनवीन शिक्षण पद्धती येत आहे तरी परंतू शिक्षकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षण देण्याची काळाची गरज आहे व येणाऱ्या पिढीत माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी शिक्षक व पालकांनी संवाद वाढवावा असे आवाहन संवाद तज्ञ गणेश शिंदे यांनी शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात दि.१० सप्टेंबर रोजी केले.
ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्यातील शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळा शहरातील शांताई मंगल कार्यालयात झाला अध्यस्त आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संयोजक आ ज्ञानराज चौगुले, बाजार समितीचे सभापती जितेंद्र शिंदे, शिवसेना किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, गट शिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, उमरगा तालुकाप्रमुख बळी सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की, शिक्षणात अमोल आग्रह बदल होत असला तरी शिक्षकाचे महत्त्व कधीही कमी होत नाही. जुन्या काळात शिक्षकांना खूप महत्त्व आदर होते. हा आदर कमी झाला असून हा काळाचा महिमा आहे. मात्र गरीबाची पोर तुमच्या हातात शिकतात. त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक बदल करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे. केवळ मार्कासाठी शिक्षण आहे. अभ्यासात एकरूप व्हा किंवा औपचारिकता नको. भारत हा जगातील मोठा बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील आघाडी घ्यावी पूर्वी पालक विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देत होते आता बंदूक भेट देत आहेत हे नवलच आहे. मोबाईलचा जास्ती वापर ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांचाही लोकप्रतिनिधी गुणगौरव करतात ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी मानले. यावेळी सचिव प्रदीप मदने, अमर देशटवर आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विशेष गौरव पुरस्कार विक्रम बलभीम पाचंगे जि.प.प्र.मानमोडी ता.तुळजापूर, ज्ञानराज दत्तात्रय लोभे भारत विद्यालय उमरगा तालुक्यातून प्रथम,
लोहारा तालुका प्राथमिक कमलाकर येणेगुरे जि.प.प्रा.शाळा दक्षिण जेवळी, गहिनीनाथ माने जि.प.प्रा., शाळा तावशीगड, दिलीप चेंडके जि.प्रा. शाळा राजेगाव, पद्माकर कांबळे जि.प. प्रा., शाळा माकणी, प्रवीण अगंबरे जि प प्रा शाळा कास्ती, दयानंद शिरसागर जि.प.कें., शाळा लोहारा, संतोष माळवदकर कें.प्रा.शाळा लोहारा, प्रमोद माने जि.प.प्रा.शाळा होळी, अर्चना साखरे जि.प.कन्या शाळा आष्टा कासार, संजय साधू भोसले, जि.प.प्रा.शाळा भोसगा, माध्यमिक व संस्था बालाजी नादरगे, निवासी अपंग शाळा सास्तुर, डी.एम.पोतदार, लोहारा हायस्कूल लोहारा, बालाजी मक्तेदार, जि.प.प्रा.शा. लोहारा, महेश कांबळे जि.प.प्र.धानोरी, आर.व्ही.पाटील, बसवेश्वर विद्यालय जेवळी, मोहन हनुमंतराव शिंदे, धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगा, उमरगा तालुका अनिता जाधव जि.प.प्र.दाळिंब, गोविंद जाधव के. प्रा. शा. दाळिंब चंद्रशेखर कांबळे जि.प.प्रा.रामपूर, पुष्पलता पांढरे जि.प.शा.कडदोरा, परमेश्वर साखरे जि.प.जकेकुर, मनोज बदिमे जि.प.प्रा.शा. कलदेव निंबाळा, संतोष चुंगे जि.प.प्र.शाळा बेडगा, राहुल कांबळे जि.प.प्रा.शा. पळसगाव, शिवशंकर नाटेकर जि प प्रा शा बेळंब, गोविंद बाबुराव कुंभार जि प प्रा शा कदेर, शिवकुमार स्वामी जि.प.प्रा.शा. कंटेकुर, राजकुमार कोराळे जि प शाळा एकुरगा, ओम प्रकाश घंटे के.प्रा.शा.तलमोड, आनंद मोरे जि.प.प्रा.शा.जगदाळवाडी, बालाजी देवलाल भोसले जि.प.प्रा.शा. केसर जवळगा, शितल हनमंत जावळे जि.प.प्रशाळा कुन्हाळी, लक्ष्मण भीमराव बनसोडे जि प प्रा शा चिंचोली भुयार, राघवेंद्र खटके जि.प.प्रा.शा. इमामसाहेबवाडी, शिवाजी जमादार जि.प.प्रा.शा.बोरी, इब्राहिम चौधरी जि.प.प्रा.शा. पेठसांगवी, अनिता माने जि.प.प्रशाला मुळज, दत्तात्रय मोहिते जि.प.प्रा.शा. कुन्हाळी, बळीराम घोरवाडे जि.प.लता मुळज तांडा, मंगल कचले, जि.प.सोशल शाळा मुरूम, उस्मान मुजावर जि.प.प्रा.शा.दगडधानोरा, माध्यमिक व संस्था पद्माकर मोरे जि.प.शाळा उमरगा, राहुल बावा जि.प.प्र.शा. नाईचाकूर, हभप हरी लवटे, नंदुराम आश्रम शाळा बलसुर, मालजी काळे छत्रपती विद्यालय बलसुर, संजय खामकर भारत विद्यालय उमरगा, रवी पाटील श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, परमेश्वर सुतार मलंग विद्यालय उमरगा, राजेंद्र साळुंखे, माधवी चालूक्य विद्यालय उमरगा, संजय कोथळीकर बसवेश्वर विद्यालय उमरगा, उल्हास घुरघुरे प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम, गजानन शेवाळे तुळजाभवानी अनाथ अपंग शाळा एकुरगावाडी, रियाज शेख उर्दू शाळा उमरगा, बाबुराव पवार के.जि.प. शाळा उमरगा, धनंजय बनसगोळे महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा, शंकर होळमजगे, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगुर, बाळासाहेब गायकवाड लोकमान्य टिळक विद्यालय कदेर, संजय देशमुख-ढोणे भारत विद्यालय उमरगा, विक्रम चव्हाण ग्रामीण प्रशाला माडज या शाळांमधील शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
.............
ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने उमरगा लोहारा तालुक्यातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. मात्र हे अर्थसहाय्य आरटीजीएसद्वारे पाठविले जाते. त्यामुळे एकही विद्यार्थी अर्थसहाय्य मिळाले नाही अशी सबब सांगून आमच्या कार्यालयापर्यंत येत नाहीत. हे आमच्या दृष्टीने कौतुकाची बाब आहे. सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवून सर्वांगीण उन्नती करण्याचा प्रयत्न केला जातो.
- Get link
- X
- Other Apps