हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आजी-आजोबा दिन साजरा

हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आजी-आजोबा दिन साजरा



मुरूम दि.१९ (प्रतिनिधी) उमरगा तालुक्यातील कंटेकूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दि.१९ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रारंभी गावातील मुख्य चौकातून प्रभात फेरी काढण्यात आली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात हुतात्मे झालेल्या व योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा नामोल्लेख करुन जय जयकार करण्यात आला.  स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार सरपंच विजया जमादार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागृत शिंदे, लक्ष्मी शिंदे आदींच्या हस्ते घालून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक कमलाकर मोटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी भुमिका शिंदे हिने हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा, उषा शिंदे हिने ईटच्या गोदावरी टेके, सुर्यजनी अचलेरे हिने स्वामी रामानंद तीर्थ, आदर्श विभुते याने वेदप्रकाश आर्य व श्रद्धा गिरी हिने सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या दिनाचे औचित्य साधून आजी-आजोबा यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांचे औक्षण करून दर्शन घेतले. शिक्षिका तनुजा गाढवे यांनी कल्पकतेने आजी-आजोबांचा मनोरंजनात्मक संगीत खुर्ची खेळ व नातवंडाचे नाते अधिक घट्ट करणारी कविता गाऊन आजी-आजोबांच्या प्रती भावना व्यक्त केल्या. संगीत खूर्ची खेळ खेळताना आजी-आजोबा यांनी उत्साहाने सहभागी होऊन आनंद घेतला. यावेळी आजी-आजोबांनी त्या काळातील प्रसंग विविध गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जमादार, बालाजी दासे, महादेव गायकवाड, लक्ष्मी घोडके, महादेवी कुंभार, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ, अंगणवाडी सेविका, पालक, आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, लक्ष्मीकांत पटणे, लतिफ लदाफ, चिञरेखा दंडे, दिंगबर दासे, रुक्मीण जमादार आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन लक्ष्मण येवते यांनी तर आभार शिवकुमार स्वामी यांनी मानले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !