के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण - आ. भारतीय १८ फुटाचा पंचधातुचा पुतळा

के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण - आ भारतीय

१८ फुटांचा पंचधातुचा पुतळा

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती कीर्ती पाटील स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष तथा आमदार श्रीकांत भारतीय यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.७ सप्टेंबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील त्रपतराव भोसले हायस्कूलच्या प्रशासकीय भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, कीर्ती पाटील स्मारक समितीचे फुलचंद गाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. भारती म्हणाले की,  महाराष्ट्रातील अनेक शिक्षण तपस्वींनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक व शैक्षणिक विकास झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्व.के.टी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्राला वाहून घेत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांनी धाराशिव शहरात शिक्षणाची गंगा आणून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुले करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकासाठी विविध २७ समित्या तयार करण्यात आल्या असून यामध्ये १७०० लोक काम करीत आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तानाजी सावंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ सुभाष देशमुख, आ सुरेश धस, आ रमेश कराड, आ. संजय केणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या १ लाख २० हजार विद्यार्थ्यापैकी ४२ हजार विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले असून त्यापैकी २७ हजार ७२ माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यामध्ये डॉक्टर, न्यायाधीश, अभियंता, विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भोसले हायस्कूलच्या मैदानावर २२ हजार नागरिक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप उभा केला असून कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता समिती घेत असल्याचे भारतीय यांनी सांगितले

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !