आयुष्मान भव: मोहिमेमध्ये अवयवदान प्रतिज्ञा व ऑनलाईन नोंदणी करावी

आयुष्मान भव: मोहिमेमध्ये अवयवदान प्रतिज्ञा व ऑनलाईन नोंदणी करावी


 


धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - आयुष्मान भवः मोहिमेमध्ये अवयवदान प्रतिज्ञा व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी वेब लिंक https://notto.abdm.gov.in / pledge-registry/ व वेब साईट www.notto.mohfw.gov.in  वर जाऊन आपला आधार नंबर टाकून मोबाईल ओटीपी जनरेट होईल. आलेला ओटीपी टाकून पुढील अवयवदान संमतीपत्र भरण्याची प्रक्रिया करावी. यामध्ये आपण अवयवयामध्ये लिव्हर, किडणी, पॅनक्रियाज, फुफुस, आतडे, उतीमध्ये हाडे, हृदयाच्या झडपा, कातडी, नेत्रबुब्बुळे, कार्टीलेज, रक्तवाहीनी यापैकी अवयवयाची आपण नोंदणी करताना निवड करू शकता. तसेच आपला रक्तगट टाकून आपल्या परिवारातील एका व्यक्तीचा मोबाईल नंबर नमुद करावा व या मोबाईल नंबरवर एसएमएसव्दारे अवयव नोंदणी केलेबाबतचा एसएमएस येतो. त्यामुळे आपण आपल्या जिल्ह्याची अवयव संमतीपत्राची संख्या वाढविण्यास मदत होईल. तसेच यामुळे महाराष्ट्र राज्याचे काम वाढून भारत देशाचे काम देखील वाढेल. सध्या गणपती उत्सव चालू असल्यामुळे सर्व गणेश भक्तांनी ऐच्छिकपणे अवयवदान समंतीपत्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकरी, कर्मचारी यांनी ऐच्छिकपणे अवयवदान समंतीपत्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !