गणेशोत्सव, दसरा सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ व्यावसायिकांनो खबरदार

गणेशोत्सव, दसरा सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ व्यावसायिकांनो खबरदार


धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात सप्टेंबरपासून सर्वत्र गणेशोत्सव, दसरा आदी सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यानिमित्त विविध मंडळ भंडारा, प्रसाद, अन्नदान आदी कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे सर्व सार्वजनिक, धार्मिक उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन करणारे, वितरण करणारे व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्यांअतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत www.foscos.fssai.gov.in  या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करून प्रतिवर्षी १०० भरावे व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात यावे.  प्रसाद तयार करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारे अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावे. ज्या केटरर्सकडे परवाना/नोंदणी आहे, अशाच केटरर्सकडून प्रसाद बनवून घेण्यात यावे. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी.  आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थाची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
                 तसेच जिल्ह्यातील सर्व स्वीटमार्ट उत्पादक, विक्रेत्यांनी सणासुदीच्या काळात स्वच्छ, ताजे मिठाई/मोदकचे उत्पादन व विक्री करावी, कच्चामाल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावा. त्याची पक्की बिले घेवून पेढीमध्ये जतन करून ठेवावे. मिठाईच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोरचा बोर्ड लावाला. 
                 तसेच अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती  स्थापन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी  दुध  व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार / जिल्ह्यात कोठेही दुध व  दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्यास कार्यालयास किंवा टोल फ्री क्र.१८००२२२३६५ या क्रमांकावर तक्रार नोदवून सहकार्य करावे. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शि.बा. कोडगिरे यांनी केले आहे.
                            

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !