आज कळंब येथे शिवसेनेच्यावतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

आज कळंब येथे शिवसेनेच्यावतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

कळंब दि.१० (प्रतिनिधी) - शिवसेना (ठाकरे) च्यावतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन दि.११ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. शहरातील ढोकी रोडवरील साई मंगल कार्यालयात हा नोकरी महोत्सव होणार आहे. या सुवर्ण संधीचा बेरोजगार युवक, युवतींनी लाभ घ्याव असे आवाहन विश्वजीत जाधव त्यांनी केले.

कळंब शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील ३५ कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतींची पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे. तर ज्यांना नोकरी मिळणार नाही अशा युवक, युवतींना जॉब कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात कळंब शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी सहभागी होऊन नोकरीचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !