के.टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन
के.टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - येथील नेहरु युवा केंद्र व दैनिक उस्मानाबाद टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेस जिल्ह्यातील प्रथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतील प्रती शाळा एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी स्पर्धेत सहभागी करून मुलांच्या कला गुणांना वाव देऊन दैनिक उस्मानाबाद टाइम्सला सहकार्य करावे. तसेच या स्पर्धा दि. ३ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. तर या स्पर्धेसाठी सकाळी १० ते ११ या वेळेत नोदणी करता येईल. स्पर्धेचे विषय, नियम व बक्षीस तसेच स्थळ पुढील प्रमाणे विषय भारताची डिजिटल अर्थ व्यवस्था फायदा - तोटा, आम्हास माहित असलेले के. टी. पाटील सर, वेळ ७ मिनिटे, मातृभाषेत वक्तृत्व, बक्षीसे प्रथम, द्वितीय, तृतीय, पाच उत्तेजनार्थ व प्रमाणपत्र असे आहे. तसेच या स्पर्धा श्रीपतराव भोसले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय के.टी. पाटील सभागृह येथे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दैनिक उस्मानाबाद टाइम्सचे संपादक सुधीर पाटील यांनी केले आहे.