जयलक्ष्मी शुगरकडील थकीत ऊस बील देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जयलक्ष्मी शुगरकडील थकीत ऊस बील देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी



धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगरकडील ऊस बिलाची थकीत रक्कम शेतकर्‍यांना तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.
धाराशिव तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी कारखाना दुसर्‍या संस्थेला चालविण्यास देण्याच्या हालचाली सुरू असून थकीत रक्कम न मिळाल्या शिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केली आहे. तसेच या साखर कारखान्याकडे सन २०१४ पासून ऊस बिलाची रक्कम थकलेली आहे. ती रक्कम शेतकर्‍यांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सतत पाठपुरावा करुनही अनेक शेतकर्‍यांची बिले अजुनही थकीत आहेत. तर यावर्षी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच कारखान्याकडील थकीत ऊस बील मिळेल या आशेवर असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या सणातही शेतकर्‍यांच्या खात्यात लक्ष्मी अवतरली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हक्काचे, घामाचे पैसे तात्काळ देऊन आमची हक्काची लक्ष्मी आमच्या झोळीत टाकावी यासाठी गौरी-गणपती पूजनाच्या दिवशी आम्ही मागणी करीत आहोत. तसेच धाराशिवसह लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून ऊस लागवड करुन जयलक्ष्मी शुगर साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. परंतू सन २०१४ पासून या कारखान्याकडे ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. आज ना उद्या बिल मिळेल या आशेवर शेतकरी होते. मात्र सध्या कारखानाही बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या कारखान्याकडे असलेली थकीत रक्कम शेतकर्‍यांना मिळवून द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, शेतकरी शिवाजी चव्हाण, देवीदास पवार, महादेव चव्हाण, सुभाष राठोड, भिमराव राठोड, रामचंद्र पवार, गोविंद चव्हाण, मोतीराम राठोड, केशव चव्हाण, योगेश राठोड, विनायक पवार, राजकुमार राठोड, बाबु चव्हाण, दामाजी राठोड, विनायक राठोड, सतीश चव्हाण आदींच्या सह्या आहेत. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !