दिव्यांगांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि.२१ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार नोकरी इच्छूक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करते.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानातंर्गत धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद यांच्यावतीने दिव्यांग उमेदवारासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन छायादीप मंगल कार्यालयात केले आहे.
            या रोजगार मेळाव्यात निर्मान ऑर्गनायजेशन, नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर,एलआयसी ऑफ इंडिया धाराशिव, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अलमप्रभू गारमेंट असोसिएशन व अलमप्रभू कोअर पाईप मॅनिफॅक्चरिंग या ६ आस्थापना/ कंपन्या सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यातुन १६६ पात्रताधारक दिव्यांग उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
             पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरी इच्छूक दिव्यांग उमेदवारांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. ०२४७२-२९९४३४ यावर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व समाज कल्याण दिव्यांगांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन 

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि.२१ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार नोकरी इच्छूक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करते.

 दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानातंर्गत धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद यांच्यावतीने दिव्यांग उमेदवारासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन छायादीप मंगल कार्यालयात केले आहे.

            या रोजगार मेळाव्यात निर्मान ऑर्गनायजेशन, नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर,एलआयसी ऑफ इंडिया धाराशिव, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अलमप्रभू गारमेंट असोसिएशन व अलमप्रभू कोअर पाईप मॅनिफॅक्चरिंग या ६ आस्थापना/ कंपन्या सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यातुन १६६ पात्रताधारक दिव्यांग उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

             पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरी इच्छूक दिव्यांग उमेदवारांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. ०२४७२-२९९४३४ यावर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !