नवीन बस सुरु करण्याची प्रवाशांची मागणी
नवीन बस सुरु करण्याची प्रवाशांची मागणी
परंडा दि.८ (प्रतिनिधी) - परंडा आगारातील जुन्या गाड्या प्रवासा दरम्यान बंद पडत आहेत. त्यामुळे अशा बसेस बंद करून नवीन बसेस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी एका नियोजनाद्वारे आगारज्ञप्रमुखांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात अशी नमूद करण्यात आले आहे की, लांब पल्याचे मुंबई, हैदाबाद, रत्नागिरी, शिर्डी बस चालू करण्यात यावी. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर, जर्नाधन मेहेर, डॉ. अब्बास मुजावर , राफिक मुजावर, तुकाराम गायकवाड, उमेश परदेशी, कुणाल जाधव, तय्यब मुजावर, अहेमद भोले आदी उपस्थित होते.