शिवसेना (ठाकरे) च्यावतीने कंत्राटी नोकर भरतीच्या अध्यादेशाची होळी
शिवसेना (ठाकरे) च्यावतीने कंत्राटी नोकर भरतीच्या अध्यादेशाची होळी
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) -
महाराष्ट्र शासनाने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेमार्फत भरती करण्यासाठी एजन्सींना मान्यता दिली आहे. बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणार्या या शासन निर्णयाची युवा सेना, शिवसेनेच्या (ठाकरे) च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी करून राज्य सरकारचा दि.२१ सप्टेंबर रोजी निषेध केला. कंत्राटी नोकरभरती रद्द झालीच पाहिजे, पन्नास खोके, एकदम ओके, या सरकारचं करायचं काय - खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची सदबुद्धी सरकारला मिळो म्हणून तीन गाढवांना विनवणी करण्यात आली.
राज्य सरकारने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्था/एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय दि.६ सप्टेंबर रोजी जारी केला आहे. हा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा आहे. यावेळी बोलताना युवा सेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे यांनी, राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कंत्राटी भरतीसाठी नियुक्त केलेल्या कंपन्या या राज्यातील मंत्री, त्यांचे नातेवाईकांच्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांना मान्यता देण्यात येऊ नये. तसेच शासन निर्णय रद्द न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनीही बेरोजगार तरूणांवर अन्याय करणार्या शासन निर्णयाचा निषेध करत सरकारने हा शासननिर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.
या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहरप्रमुख रवि वाघमारे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, तुषार निंबाळकर, सुरेश गवळी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पांडुरंग भोसले, पंकज पाटील, राणा बनसोडे, नाना घाडगे, नितीन शेरखाने, राकेश सूर्यवंशी, वैभव वीर, अभिराज कदम, विक्रम पाटील, गणेश साळुंके, पांडुरंग माने, जगदीश शिंदे, संकेत सूर्यवंशी, प्रशांत जगताप, रुपेश शेटे, मुजीब काझी, सय्यद साबेर, साजीद शेख, शिवप्रताप कोळी, पृथ्वीराज देडे, शरीफ शेख, नवज्योत शिंगाडे, अरबाज शेख, किरण बोचरे, अमोल जाधव, आकाश मुंगडे, राज निकम, अविनाश इंगळे, प्रशांत बोंदर, गफुर शेख, महेश लिमये, मुकेश शिंदे, यशवंत शहापालक, पिंटू कदम, अजिंक्य राजेनिंबाळकर, निलेश शिंदे, मनोज जाधव, प्रदीप साळुंके, रोहीत भांडवले, शिरीष वाघमारे, अक्षय खळदकर, अण्णा तेरकर, अविनाश इटकर, महेश उपासे, ओंकार बांगर, शुभम डांगे, सचिन बेद्रे, अक्षय कोरे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.