दहिफळ येथील उपोषणकर्ते भातलवंडे यांची प्रकृती खालावली
दहिफळ येथील उपोषणकर्ते भातलवंडे यांची प्रकृती खालावली
कळंब दि.९ (प्रतिनिधी) - तालुक्यातील दहिफळ येथील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण गेल्या ६ दिवसांपासून किरण भातलवंडे यांनी सुरू केले.
उपोषणकर्ते किरण भातलवंडे यांनी अन्नाचा त्याग केला असून प्रकृती खालावली आहे. तर डॉ सुजीत राऊत यांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतू जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण मागे घेत नाहीत. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार केला आहे.
मराठा आरक्षणासाठी गावोगावचे तरुण मनोज जरांगे-पाटील यांना पाठींबा देण्यासाठी उपोषण करत आहेत. कळंब तालुक्यातील दहीफळ येथील भातलवंडे यांनी उपोषण करुन पाठिंबा दिला आहे. तर दहीफळ येथील ३० तरुणांनी मुंडन करून भातलवंडे यांना पाठिंबा दिला आहे.
आ. कैलास पाटील यांनी दि.८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दहिफळ येथे येऊन भातलवंडे यांची भेट घेतली. उपोषण मागे घ्यावे असा सल्ला आ पाटील यांनी भातलवंडे यांना दिला आहे. परंतू जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण मागे घेणार नाहीत. तोपर्यंत मी उठणार नाही असा निर्धार केला आहे. त्यामुळे आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ आदी काळजीत पडले आहेत.