बँकेचे कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना बँकेकडे कर्जासाठी पाठवावे - पाटील
बँकेचे कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना बँकेकडे कर्जासाठी पाठवावे - पाटील
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - समर्थ अर्बन बॅंकेने रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती केली असून प्रत्येक वर्षी बॅंकेची वाटचाल भरभराटीकडे होत आहे. बॅंकेतील ठेवीदारांना प्रती व्यक्ती ५ लाख रुपयांपर्यंत ठेव विमा संरक्षण असून सर्व सभासद व खातेदारांनी आपल्याच बॅंकेत ठेवी ठेवाव्यात. तसेच बॅंकेतील कर्जाची चांगल्या प्रकारे परतफेड करणाऱ्या कर्जदारांना देता यावे यासाठी चांगले कर्जदार बॅंकेकडे पाठवावेत असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष ऍड. मिलिंद पाटील यांनी केले.
समर्थ अर्बन बँकेच्या २७ व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅंकेचे संचालक रमण धोत्रीकर, नारायण कठारे, अरुण गोरे, रणजीत कोळपे, पाटील, मेघ:शाम देशमुख, रामदास कोळगे, सुरेश खांडेकर, संचालिका शर्मिष्ठा डांगे, संगीता सरवदे आदी उपस्थित होते. प्रारंभी ज्ञात, अज्ञात व्यक्ती व विविध क्षेत्रातील ज्या व्यक्ती मागील वर्षी मयत झाल्या तर किल्लारी भूकंपात १० हजार व्यक्ती मयत झाले त्या घटनेला ३० सप्टेंबर ला ३० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. हैद्राबाद मुक्ती दिनाचे औचित्य साधून यावर्षी एखादी व्याख्यानमाला घ्यावी असा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत बॅंकेत ठेव संकलन उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ सभासदांच्या हस्ते समर्थांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. जेष्ठ सभासद उमाकांतराव नायगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर बॅंकेचे उपाध्यक्ष अशोक पाटील दुधगांवकर यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सूत्रसंचालन व्यवस्थापक डी.जी. कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार दुधगावकर यांनी मानले.