आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुला-मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे - न्या. शेंडे

आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुला-मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे - न्या. शेंडे

धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - आदिवासी समाजाच्या विकासासाठी, आदिवासी समाजातील १० वर्षाच्या खालील सर्व मुला-मुलींनी शिक्षण घेणे ही मुलभुत गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अंजू एस. शेंडे यांनी दि.६ सप्टेंबर रोजी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक साक्षरता दिनानिमित्त ढोकी येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात कायदे विषयक जनजागृती, शासकीय योजनांची माहिती व शिक्षणचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश -१ आर.एस. गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल  कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी एम. रमेश, अप्पर तहसिलदार निलेश काकडे, प्रभारी गट विकास अधिकारी बी.आर. ढवळशंख, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, दिवाणी न्यायाधीश व स्तर बी.यु. चौधरी, मुख्य न्याय दंडाधिकारी एम.एस. भदाणे, सोलापूर येथील आदिवासी विकास निरीक्षक विशाल सरतापे आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की,पोलीस दलातर्फे मिशन पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून पारधी समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आण्ण्यासाठी राबविण्यात येत आसलेल्या विविध योजना व कार्यक्रमाची माहित सांगितली. तसेच पारधी समाजातील लोकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याग करुन शिक्षणाला महत्व द्यावे.  तसेच आदिवासी समाजातील तरुण मुलांनी पोलीस खात्यामध्ये नोकरी करण्यास इच्छूक असल्यास त्यांनी पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून मोफत प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन केले. तर पारधी समाजातील महिला व पुरुष यांना विविध शासकीय योजनेबाबत निलेश काकडे, बी.आर. ढवळशंख, सुधा साळुंके यांनी मार्गदर्शन केले. तसेच विशाल सरताने यांनी आदिवासी समाजासाठी शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत यादव यांनी तर सपोनि जगदीश राऊत यांनी आभार मानले. यावेळी पारधी समाजासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !